FireCrackers: माणुसकीला काळीमा! तोंडात फटका फुटल्यानं गायीचा जबडा उद्ध्वस्त

सीसीटीव्ही फुटेज तपासून यामागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
viral video_
viral video_

कानपूर : दिवाळीत फटाक्यांच्या दुष्परिणांबाबत अनेक चर्चा झडत असतानाच एक माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट समोर आली आहे. फटाका बॉम्ब तोंडात फुटल्यानं एका गायीचा जबडाच उद्ध्वस्तच झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला यानंतर स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.

viral video_
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचं आश्वासन दिलं, पण...; अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती

कानपूरचे स्थानिक पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. यामध्ये कोणीतरी खोडसाळपणाच्या उद्देशानं हे अघोरी कृत्य केलंय की, रस्त्यावर पडलेला फटाका या गायीनं खाल्ला हे तपासलं जाणार आहे. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालंय की, तोंडात फटाका फुटल्यानंच गायीच्या जबड्याला दुखापत झाली आहे. पण व्हिडिओतील घटनास्थळ स्पष्ट होत नसल्यानं पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहे.

viral video_
Tata-Airbus project: टाटा एअरबस प्रकल्पावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय जाणून घ्या

या घटनेची सत्यता तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जर कोणी जाणूनबुझून हा खोडसाळपणा केला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच दुसरीकडं महापालिकेनं या गायीवर उपचार सुरु केले आहेत.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दिसली गाय

व्हिडिओमध्ये संबंधित गाय ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभी असलेली दिसून आली. त्यानुसार पोलिसांना असाही अंदाज आहे की, या गायीनं कचऱ्यात पडलेलाच एखादा पेटता फटाका खाल्ला असावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com