
Satyajit Tambe : नाना पटोलेंना पाहताच सत्यजित तांबेंनी हात पुढे केला, तरी नानांचं दुर्लक्ष...
राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. कालपासून राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला सुरवात झाली. या अधिवेशनसाठी सर्व आमदार एकत्रित दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून अंतर्गत वाद आणि नाराजी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच सर्व नेते एकत्रित दिसून आले.
अशातच काँग्रेसचा हा वाद समोर आलेलं कारण म्हणजे नशील पदवीधर निवडणुकामध्ये अपक्ष म्हणून अर्ज करणारे सत्यजित तांबेही या अधिवेशनाला उपस्थित होते. त्यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अशातच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विधानभवनाच्या पायऱ्यावरील आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिकाऱ्यांशी बोलण्यात गुंग होते तेव्हा सत्यजित तांबेंनी नाना पटोलंना पाहताच ते नानांशी बोलण्यासाठी म्हणून पुढे आले. त्यांनी स्वत; जाऊन नानांची भेट घेत हात मिळवला.. नानांनी औपचारिकता म्हणून हात मिळवत तांबेंसोबत बोलणं टाळलं आणि पुन्हा अधिकाऱ्यांशी बोलू लागले.
बराच वेळ सत्यजित तांबे तिथे होते इतर अधिकाऱ्यांशी हात मिळवत होते पण तरीही त्यांनी तांबेकडे ना पाहिलं नाही त्यांना बोलण्याबाबत काही प्रतिसाद दिला. यावरून नाना आणि सत्यजित तांबे यांच्यात नाराजीचा सूर अजूनही आहे हे स्पष्ट दिसून आलं आहे.
काही वेळ थांबून सगळ्यांशी हात मिळवणी करून सत्यजित तांबे तिथून पुढे निघून गेले. परंतु या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.