महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित

वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आपले ३ तर महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर भाजप आपले ३ तर महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला १-१ उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या १ जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

तत्पूर्वी, राज्यसभेच्या एका नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. महाराष्ट्रात सध्या भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यामुळे महाविकासआघाडीकडून ०४ तर भारतीय जनता पक्षाकडून एकूण ०३ उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण ०७ खासदार नियुक्त होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection for 7 seats in Rajya Sabha from Maharashtra