Video : स्वतःचे घर ना दार..आकाशकंदील विकून पोट भरायचं..एवढच ठावं!

kandil.jpg
kandil.jpg

नाशिक : स्वतःचे ना घर..ना दार...ना त्या घराला कसला आकाश कंदील... परंतू आपला आकाश कंदील दुसऱ्याच्या घराला लागलेला पाहून दिवाळी सण साजरे करणाऱ्या या आकाश कंदील विक्रेत्याचे नाशिकशी अतूट नातेच बनल्याचे बघायला मिळत आहे. आंध्र प्रदेश मधील काही कुटुंब नाशिकमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून विक्री करत असल्याचे जागो जागी दिसून येत आहे. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेले हे कुटुंब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात दरवर्षी दिवाळीपूर्वी येऊन मिळेल त्या जागेचा सहारा घेत आकाश कंदील बनवत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

सर्व प्रकारचे ग्राहक येथे थांबले नाही तर नवल ! 
आंध्रातील एक कुटुंब गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक जवळील कर्मयोगिनी नगरच्या चौफुलीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर कंदील बनविताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत असलेले सर्व प्रकारचे ग्राहक येथे थांबले नाही तर नवल ! आंध्रातील या विक्रेत्यांना मराठी व हिंदी भाषा समजत नाही व बोलता येत नाही तरीदेखील ते ग्राहक विक्रेत्यांशी तोडक्या मोडक्या भाषेत चांगलाच संवाद करताना दिसून येतात. केवळ डाळ-भात वर गुजराण करत आपले पोट भरतात. यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील काही सदस्यही मदत करतांना दिसतात. आपले घरदार सोडून महाराष्ट्रात आलेले या विक्रेत्यांना एक आपुलकीची किनारही  मिळत आहे. थोडक्यात काय तर पोटासाठी कायपण हाच प्रकार येथे बघायला मिळत आहे.

 आंध्र मधून कच्चा माल मागवून दिवस-रात्र आकाश कंदील बनवितात

आपल्या परिवारासह हे कुटुंब आपले राज्य सोडून या ठिकाणी आकाशकंदील विक्रीचा व्यवसाय करीत आहे. याकरता लागणारे साहित्य ते आंध्र प्रदेशमधून मागवितात. कच्चा माल मागवून ते दिवस-रात्र आकाश कंदील बनवताना दिसतात. आपल्या डोळ्यासमोर आकाश कंदील बनवीत असल्याचे बघून ग्राहक या ठिकाणी आकर्षित होऊन थांबलाच पाहिजे असे दृश्य बघायला मिळते. शंभर, दीडशे ते अडीचशे रुपया पर्यंत आकाश कंदील स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांचा कल याठिकाणी अधिक प्रमाणात दिसून येतो.  

प्रतिक्रिया 

आम्ही दरवर्षी आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात येत असतो. नाशिक मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. चांगला पैसा मिळत असल्याने तो वर्षभर आम्ही गावाकडे पुरवतो. - नरसय्या,आकाश कंदील विक्रेता

आकाश कंदील विक्री करिता नाशिक हे अतिशय चांगले शहर आहे. आमचे आकाश कंदील त्यांना आवडतात. यापूर्वी चांगला मिळालेला प्रतिसाद बघून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता चांगला व्यवसाय आम्ही करतो- नरसय्या, विक्रेती

आम्ही मुंबईला राहतो वडिलांनी याठिकाणी आकाश कंदील बघितले, फोन वरून त्यांनी सांगितले हेच आकाशकंदील घेऊन या म्हणून आम्ही  आकाश कंदील घेण्यासाठी आलो.- पिया भुरके व प्रणव नरूला, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com