महाराष्ट्राबद्दल आपुलकी नसलेल्या राज्यपालांना दुसरीकडं पाठवा - काँग्रेस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राज्यात मोठं वादंग निर्माण झालं आहे.
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyarisakal

मुंबई शहराबद्दल अवमानकारक विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सध्या चहुबाजूने टीकेचा भडीमार होत आहे. त्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही त्यामुळं त्यांना दुसरीकडं पाठवा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. (Send Bhagat Singh Koshyari send elsewhere Yashomati Thakur demands to President)

Governor Bhagat Singh Koshyari
देशातील ७३ टक्के मुलांना सोशल मीडियाचं व्यसन; १० पैकी तीन नैराश्यग्रस्त - Study

ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. या मुंबईत देशातील आणि जगभरातील लोक राहतात. मुंबईबाबत राज्यपालांनी केलेलं विधान महाराष्ट्रद्रोही आहे. मुंबईचं वर्क कल्चर पाहिलं तर इथं संकटकाळात लोक एकत्र येतात. महाराष्ट्रातील लोकं मोठ्या प्रमाणात इथं राहतात. त्यामुळं राज्यपालांना सातत्यानं महाराष्ट्रद्रोही विधानं करणं शोभत नाही.

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपालांच्या विधानावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्यानं महाराष्ट्रद्रोही विधानं करत आहेत. त्यामुळं ज्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल आपुलकीच नाही त्याला इथं ठेवून काय फायदा? राष्ट्रपतींनी याचा विचार करावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com