JusticeForPayal : रॅगिंग होतंय.. ही विकृती थांबवायची कशी? व्यक्त व्हा!

payal
payal

मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालय वसतिगृहात शिकाऊ डॉक्टर पायल तडवीने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून मानसिक छळ व हॉस्टेलवर रॅगिंग झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानपणापासून आई-वडिलांनी तिला कष्टाने वाढवलं होतं. ती डॉक्टर झाली पण भविष्यात तिचं काम करायचं स्वप्नं अपूर्णचं राहिलं. मानसिक छळ आणि रॅगिंगपुढे ती हतबल झाली आणि तिने तिचं आयुष्यचं संपवलं. या संबंधी तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्यात तिचा काय दोष होता?  

आता पुढील कारवाई होईल, पण याला आणखी किती पायल बळी पडणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. रॅगिंग प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे. 

महाविद्यालय असू दे किंवा नोकरीचं ठिकाण, रॅगिंगविषयी बोलायला फार कोणी पुढे येत नाही. रॅगिंग सहन करण्यापेक्षा त्याविरोधात आवाज उठवणं महत्त्वाचं आहे. रॅगिंगचा असाच काही अनुभव तुम्हाला आलाय का? त्यावर तुम्ही काही ठोस उपाय शोधला का? शोधला असेल तर आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com