निर्दोष सुटूनही चौघांना जन्मठेपेची शिक्षा

सुषेन जाधव
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

उदगीर (जि. लातूर) : येथील सत्र न्यायालयाने निर्दोषमुक्त केलेल्या चौघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती व्ही. विभा कंकणवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सूर्यभान गोविंदराव हुले, गहिनीनाथ गोविंदराव हुले, पंडितकुमार गहिनीनाथ हुले आणि महेंद्रकुमार हुले अशी त्या आरोपींची नावे आहेत. 

लातूर जिल्ह्यातील दैठाणा (ता. शिरुर अनंतपाळ) येथील नामदेव नागप्पा काकनाळे यांनी देवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, या चार जणांसह इतर सहा जणांनी त्यांचा मुलगा बब्रुवान याला जमिनीच्या वादातून ठार मारले. तर अंकुश आणि रामदास या दोन मुलांना बेदम मारहाण केली. 25 जून 2000 रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2005 रोजी उदगीर सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या आदेशाविरोधात राज्य शासनाने खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यानुसार या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

युक्तीवाद ठरला महत्त्वाचा 

या खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सहा साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळाचा पंचनामा, जप्त केलेली हत्यारे, आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग हा भक्कम पुरावा आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे केला. तसेच बचाव करताना आरोपींनी केलेल्या मारहाणीत हा खून झाल्याचे आरोपींचे म्हणणे होते. मात्र, बचावाच्या सर्व पातळ्या तोडून आरोपींनी हा खून केल्याचे म्हणणे अतिरिक्त अभियोक्ता महेंद्र नेरलीकर यांनी मांडले. सुनावणीअंती खंडपीठाने चार जणांना भादंवि कलम 302,149 नुसार जन्मठेप, कलम 307 अन्वये पाच वर्षे तर कलम 324 अन्वये तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली

Web Title: Sentenced to life imprisonment for four