राज्यात साडेसहा हजार जणांना डेंगीची लागण; चार जणांचा मृत्यू

Seven and half thousand people get dengue in the state
Seven and half thousand people get dengue in the state

नगर, ता. 26 ः राज्यात डेंगीने थैमान घातलेले आहे. डेंगीला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले आहेत. मात्र, या प्रयत्नांना यश येत असताना त्यावर पाऊस पाणी फिरवीत असल्याने ही साथ कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. राज्यातील 31 जिल्हे व 26 शहरांमध्ये एकूण सहा हजार 390 जणांना डेंगीची लागण झालेली असून, चार जणांचा मृत्यू झालेला आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचे पाणी घरांवरच्या छतांवर व खड्ड्यांमध्ये साठत असल्यामुळे त्या घाण पाण्यामध्ये डेंगीचे डास तयार होत असल्याने ही साथ पसरत आहे. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यांना सर्वसामान्यांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने ही साथ राज्यभर फैलावत चाललेली आहे.

राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये 2845 आणि 26 शहरांमध्ये 3545 जणांना डेंगीची लागण झाली असून, चार जणांचा मृत्यू 30 सप्टेंबरअखेर झालेला आहे. 2017 मध्ये ग्रामीण भागात 2053 व शहरात 5776 अशा एकूण 7829 जणांना डेंगीची लागण होऊन 65 जणांचा मृत्यू झाला होता. 2018मध्ये ग्रामीण भागात 3700 व 7338 शहरी भागातील नागरिकांना डेंगीची लागण होऊन 70 जणांचा मृत्यू झाला होता. मागील तीन वर्षांपासून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये डेंगीची लागण होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

चिकुनगुणियाचे बारा जिल्ह्यांत रुग्ण राज्यातील 12 जिल्ह्यांत चिकुणगुण्याची लागण झालेल्यांची संख्या सप्टेंबरअखेर 704 एवढी होती. यामध्ये ग्रामीण भागातील 294, तर महापालिका हद्दीतील 409 जणांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चिकनगुणियाची साथ आटोक्‍यात आणण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. 2017 मध्ये राज्यातील 21 जिल्ह्यांत 1438, तर 2018मध्ये 21 जिल्ह्यांत 1026 एवढ्या रुग्णांची संख्या होती. राज्यात कोल्हापूर आघाडीवर राज्यात डेंगीची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात असून, त्याखालोखाल रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तिसऱ्या स्थानी यवतमाळ जिल्ह्याचा नंबर लागत आहे. नगर जिल्ह्याचा नववा क्रमांक लागत आहे.

कोरडा दिवस पाळणे आवश्‍यक

प्रत्येकाने घरात एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्‍यक आहे. घराच्या अडगळीला पडलेल्या वस्तूंची लवकर विल्हेवाट लावणे महत्त्वाचे असून, घराशेजारी साचलेल्या पाण्यात काळे ऑइल टाकल्यानंतर त्यावर डास तयार होत नाही. कोणताही ताप असल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. हे सर्व उपाय प्रत्येकाने केले, तर डेंगीची साथ लगेच आटोक्‍यात येईल. - संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com