esakal | पीएमपीचे नवे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Laxminarayan Mishra

पीएमपीचे नवे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा (Laxminarayan Mishra) यांची पीएमपीचे अध्यक्ष (PMP Chairman) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने शुक्रवारी नियुक्ती केली. पीएमपीचे अध्यक्षपद रिक्त असल्याबद्दल ‘सकाळ’ने शुक्रवारी आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाली आहे. (PMP New Chairman Laxminarayan Mishra)

मिश्रा हे २०१२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. नाशिक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची रत्नागिरीत जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. आता त्यांची पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालपदावर नियुक्ती झाली आहे. मिश्रा मूळचे ओरिसाचे आहेत. त्यांचे शिक्षण तमिळनाडूत झाले. मराठीही ते उत्तम बोलतात.

हेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

पीएमपीचे अध्यक्षपद ३० जूनपासून रिक्त असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने ९ जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते. गेल्या १४ वर्षांत पीएमपीला १६ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यात फक्त एकाच अधिकाऱ्याला कार्यकाळ पूर्ण करता आला होता, असे त्यात म्हटले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्याच्या काही भागासाठी पीएमपी ही रक्तवाहिनी समजली जाते. या तिन्ही ठिकाणी पीएमपीची सेवा आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २ हजार बस आहेत. त्यातील सुमारे १६५० बस रस्त्यावर असतात. कोरोनापूर्व काळात सुमारे ११ लाख प्रवासी पीएमपीचा रोज वापर करीत होते. सध्या ५० टक्के पीएमपीच्या बस ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू आहेत.

loading image