Maratha Reservation Protest: जालन्यातील घटनेचे पडसाद दुसऱ्या शहरातही, शहागड बस स्थानकातील ३ बस पेटवल्या

जालन्यात मराठा आंदालनाला गालबोट लागले आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.
Maratha Reservation Protest: 
जालन्यातील घटनेचे पडसाद दुसऱ्या शहरातही, शहागड बस स्थानकातील ३ बस पेटवल्या

जालन्यातील अंतरवलीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाकडून उपोषण करण्यात आले होते. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनाचे रुपांतर हिंसेत झाले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर वाद चिघळला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी टिअर गॅस आणि हवेत गोळीबार केला.

जालन्यातील या आंदोलनाचे पडसाद आता राज्याच्या दुसऱ्या भागातही उमटत आहे. या घटनेनंतर बीडमधील संघटनांनी बीड बंदची हाक दिली तर, नाशिकमध्ये उद्या मराठा संघटनांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. धुळे-सोलापुर महामार्गावर आंदोलकांकडून बस पेटवण्यात आली.

अशातच, शहागड बस स्थानकात उभ्या असलेल्या ३ ते ४ बस आंदोलकांनी पेटवून दिल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरलं होत आहे. या व्हिडीओमध्ये आगारात उभ्या असलेल्या बस जळताना दिसतं आहेत.

Maratha Reservation Protest: 
जालन्यातील घटनेचे पडसाद दुसऱ्या शहरातही, शहागड बस स्थानकातील ३ बस पेटवल्या
पोलिसांनी मराठा आंदोलकांवर का केला लाठीचार्ज?, जालन्यात नेमकं काय घडलं?; संपूर्ण घटनाक्रम वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com