राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे ‘जीवनविद्या मिशन’

२०२३ हे वर्ष ‘जीवनविद्या मिशन’ श्री सद्‌गुरूंचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. या निमित्त संस्थेने प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संकल्प हाती घेतले आहेत.
Jevanvidya Mission
Jevanvidya Missionsakal

- शैलेश जोशी, पुणे

२०२३ हे वर्ष ‘जीवनविद्या मिशन’ श्री सद्‌गुरूंचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. या निमित्त संस्थेने प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संकल्प हाती घेतले आहेत. ‘विश्वप्रार्थना घरोघरी’ आणि ‘प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’..श्री सद्‌गुरूंनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च महत्त्व दिलंय.

१९२३ मधील २१ ऑक्टोबर…. याच दिवशी या पृथ्वीतलावर एका महापुरूषाचा जन्म झाला होता… त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या घरात जितका आनंद झाला असेल त्याहून कितीतरी पट आनंद पुढे त्यांनी विश्वभरात वाटला आणि लुटला… ते महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सदगुरू श्री वामनराव पै… वामनराव पै यांचे लहानपण आपल्या सर्वांसारखंच सामान्य असलं तरी त्यांची विचारसरणी मात्र सर्वसामान्य नक्कीच नव्हती.

त्यांनी १९४४ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र (Economics) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मंत्रालयात नोकरीला लागले. आयुष्यभर सरकारी नोकरी करीत ते पुढे फायनान्स डेप्युटी सेक्रेटरी या पदावरून १९८१ साली सेवानिवृत्त झाले. १८ मे १९४८ साली वामनराव पै विवाहबद्ध झाले.

संसार सुखाचा करीत परमार्थ सार्थ करणाऱ्या वामनराव पै आणि शारदामाईंच्या संसाराला याच काळात सुरूवात झाली. मुळातच नामस्मरणाची आवड असलेल्या वामनराव पै यांनी वयाच्या २५ व्या वर्षी त्यांचे सद्‌गुरू श्री नाना महाराज श्रीगोंदेकर यांचा अनुग्रह घेतला.

गुरू मार्गदर्शनाखाली साधना करीत त्यांचा हा अध्यात्म प्रवास सुरू झाला. पुढे १९५२ मध्ये त्यांनी स्पिरिच्युअल सेंटर येथे लोकाग्रहास्तव पहिले प्रवचन केलं आणि मग प्रवचनं, किर्तनं, व्याख्यानं या माध्यमातूनच त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा प्रारंभ झाला.

संतती नियमनाचे महत्त्व आत्ता लोकांना कुठेतरी समजू लागले आहे मात्र या विषयावर समाजाला मार्गदर्शन करण्यास वामनराव पै यांनी १९५४ मध्ये सुरूवात केली होती. यावरून ते किती दूरदृष्टी होते याची प्रचिती येते. त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना फक्त अज्ञान, अंधश्रद्धेच्या पाशातूनच वाचवलेच नाही तर कृतीतून समाजासमोर आदर्शही मांडला.

यासाठी त्यांनी प्रसंगी स्वतःच्या पत्नी सौ. शारदामाईंची ओटी विधवेच्या हातून भरून घेतली होती. त्यांनी सांगितलेले विचार आचरणात आणल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू लागले, शरीराचे महत्त्व समजल्याने अनेकांची व्यसने सहज सुटली, दैवावादाचा फोलपणा समजल्याने लोकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या, घरात महिलांना आदराची आणि सन्मानाची वागणूक मिळू लागली, अनेकांचे मोडलेले संसार सावरले गेले.

जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या सावलीत आलेल्या प्रत्येकाला जणू सुखी जीवन जगण्याचा राजमार्गच सापडला. पुढे या सुखी आणि समाधानी झालेल्या लोकांनीच मग कृतज्ञतेने वामनराव पै यांना ‘सद्‌गुरू’ असं म्हणण्यास सुरूवात केली. ज्यामुळे पुढे वामनराव पै हे ‘सर्वसामान्य जनतेचे सर्वमान्य सद्‌गुरू ‘म्हणून ओळखले जाऊ लागले.

कामगार विभागात प्रबोधनांचे कार्य करीत असताना १९५५ साली श्री सद्‌गुरूंनी दसऱ्याच्या दिवशी नाम संप्रदाय मंडळाची स्थापना केली. त्यानंतर ही संस्था पुढे १९७९ साली ‘जीवनविद्या मिशन’ या नावाने रजिस्टर करण्यात आली. सद्‌गुरूंनी परमेश्वर, धर्म, संस्कृती, पाप-पुण्य, विचारांचे महत्त्व, मनाचे सामर्थ्य या सारख्या अनेक विषयांवर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणाऱ्या २७ ग्रंथांचे लेखन केलं आहे. आज हे सर्व ग्रंथ लोकांना जीवनात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक

ठरत आहेत.

श्री सद्‌गुरूंनी सर्वात मोठी वैचारिक क्रांती केली ती ‘विश्वप्रार्थने’च्या रुपात.. आश्चर्य म्हणजे हीच विश्वप्रार्थना आज लाखो लोकांच्या जीवनात चमत्कार घडवून आणत आहे... सद्‌गुरूंनी जीवनविद्या मिशन संस्थेच्या माध्यमातून आजवर ११ हजारांहून अधिक प्रवचने, मार्गदर्शने केली आहेत.

महाराष्ट्र, गोवा, बेळगाव अगदी अमेरिकेतही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. यासाठी १९९८ मध्ये श्री सद्‌गुरू पहिल्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले होते. सद्‌गुरूंनी वयाच्या ८९ व्या वर्षांपर्यंत सातत्याने, निरपेक्ष भावनेने केलेल्या या प्रबोधनातून आजवर अनेकांचा लोकांचा संसार सुखाचा झाला आहे.

जीवनविद्या तत्त्वज्ञान पुढच्या पिढ्यांनाही असेच शास्त्रशुद्ध पद्धतीने मिळत राहावे यासाठी सर्वांच्या सहकार्यांने, सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी कर्जत येथे जीवनविद्या ज्ञानपीठाची निर्मिती केली. या ज्ञानपीठाच्या उदघाटनानंतर २९ मे २०१२ मध्ये श्री सद्‌गुरूंचे महानिर्वाण झाले. जीवनविद्येच्या नामधारकांसाठी हा खूप मोठा धक्का होता.

पण आपल्या लाडक्या नामधारकांसाठी व्यवस्थारुपी सद्‌गुरू कायम सोबत राहिले. प्रवचन, मार्गदर्शन, ग्रंथ, विश्वप्रार्थना आणि सदगुरुंचा पावन स्पर्श झालेले जीवनविद्या ज्ञानपीठ या सगळ्यांच्या रुपात सद्‌गुरू प्रत्येक नामधारकासोबत क्षणोक्षणी सोबत होते आणि आजही आहेत....

सद्‌गुरूंप्रमाणेच जीवनविद्या तंतोतंत जगणारे श्री प्रल्हाद वामनराव पै, म्हणजेच सर्व नामधारकांचे लाडके ‘दादा’, हा सद्‌गुरूंचा जीवनविद्या मिशनला लाभलेला सर्वात मोठा व्यवस्थारुपी आशीर्वाद ठरला..जीवनविद्येचे नामधारक आणि जीवनविद्या मिशनच्या ट्रस्टींनी या कार्याची पुढील नेत्तृत्वधुरापुढे श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या हाती दिली.

ज्यामुळे जीवनविद्या मिशन प्रल्हाद पैं च्या नेतृत्वाखाली आणखी मोठं होत गेलं… वास्तविक यापूर्वीच म्हणजे १९८१ पासूनच श्री प्रल्हाद पै संस्थेच्या कार्यात सहभागी झाले होते. पुढे १९९६ साली इतर ट्रस्ट्रीच्या आग्रहास्तव त्यांनी आजीव ट्रस्टी पदाची जबाबदारीही स्वीकारली.

श्री प्रल्हाद वामनराव पै लाईफ मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत. प्रल्हाद पै हे मुंबईतील नामांकित शिक्षण संस्था आयआयटी पवईमधून बी.टेक झाले आहेत. त्यांनी जमनालाल बजाज या शिक्षणसंस्थेतून ‘मास्टर्स इन मॅनेजमेंट’ केलंय. त्याचप्रमाणे जपानमधून ‘टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट’च शिक्षणही घेतलंय. प्रल्हाद पै हे एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमधून जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले आहेत...

कामानिमित्त त्यांनी आजवर अनेक परदेश दौरेही केलेत. जीवनविद्या परिवारासाठी अभिमानास्पद गोष्ट ही की प्रल्हाद पै यांच्या सारखे उच्च विद्या विभूषित, अभ्यासू, दूर दृष्टी असलेले महान नेतृत्व आज संस्थेला लाभलं आहे. श्री प्रल्हाद पै आणि त्यांच्या पत्नी सौ. मिलन पै यांनी २००५ साली सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनविद्येच्या कोर्सेसची’ निर्मिती केली. आज हे अभ्यासक्रम देशविदेशात वैचारिक क्रांती घडवत आहेत...

तरुणपिढीत विशेष लोकप्रिय असणारे त्यांचे वेबिनार्स ‘Pralhad Pai Speaks’ या नावाने जगभरात पाहिले जातात. त्यासोबतच प्रल्हाद पै दर आठवड्याला परदेशात टेली कॉन्फरन्सकॉलद्वारे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत यासारख्या विविध ठिकाणच्या लोकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात.

या कॉलवर वर्क लाईफ बॅलेन्स, सुदृढ नातेसंबध, सुजाण पालकत्व व दैनंदिन आयुष्यातील विविध समस्या या विषयांवर जीवनविद्या तत्त्वज्ञानानुसार मार्गदर्शन केले जाते.

या कार्याची आतापर्यंत अनेक मान्यवरांनी आणि सरकारने देखील दखल घेतलीय. नुकताच श्री प्रल्हाद वामनराव पै यांना ‘न्यूज १८ लोकमत’चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिवंगत अॅड. जे. जी. पाटील फाउंडेशन, सांगली यांच्याकडूनही ‘समाज भूषण पुरस्कारा’ने त्यांना गौरवण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे लोकमत समूहातर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इअर समाजभूषण पुरस्कार’ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते देऊन श्री प्रल्हाद पै यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

आत्तापर्यंत यांसारख्या असंख्य पुरस्कारांनी जीवनविद्या मिशन, सद्‌गुरू श्री वामनराव पै आणि श्री प्रल्हाद पै यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रल्हाद पै यांनी विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर मुलाखती दिल्या आहेत. त्यांचे अनेक लेख विविध राष्ट्रीय वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रकाशित

झाले आहेत.

जीवनातील अनेक प्रश्नांवर श्री प्रल्हाद वामनराव पै यशस्वी समुपदेशन देखील करतात. जगातील प्रत्येक व्यक्ती सुखी झाली पाहिजे हीच यामागील तळमळ आहे. आजवर श्री सद्‌गुरूंनी विज्ञाननिष्ठ विचारांद्वारे विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन करून राष्ट्र निर्मितीचे कार्य केलं तर प्रल्हाद पै यांनी या युवांना सक्षम बनवून त्यांची व्यक्तिगत भरभराट केली.

आत्मसाक्षात्कारी संत असलेल्या श्री सद्‌गुरूंनी लोकांना अध्यात्मातील खऱ्या ईश्वराची ओळख करून देत स्वयं ईश्वर होण्यापर्यंतची दिव्य साधना दिली आणि आज प्रल्हाद पै हीच साधना पुढील अनेक पिढ्यांना मिळेल याची व्यवस्था करत आहेत. प्रल्हाद पै यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशन, जीवनविद्या फाऊंडेशन आणि जीवनविद्या सेंटर अमेरिका या तीन संस्थांच्या माध्यमातून आज या कार्याचा प्रचार-प्रसार सुरू आहे.

भारत आणि भारताबाहेर जीवनविद्या मिशनच्या अनेक शाखा आहेत ज्यामधून हे कार्य लोकांपर्यंत पोहचवले जात आहे. उपासनायज्ञ, घरोघरी विश्वप्रार्थना, ग्रंथदिंडी, अभ्यासवर्ग, बालसंस्कार केंद्र, युवासंस्कार केंद्र, कोर्सेसचे आयोजन असे विविध समाजउपयोगी उपक्रम या शाखांमध्ये राबविले जातात.

ग्रामसमृद्धी अभियान, शिक्षण संस्कार अभियान, पर्यावरण जागृती अभियान, अवयवदान अभियान, रक्तदान शिबिर, ग्राहक संरक्षण अभियान, स्वच्छता अभियान, बाल सुधारगृह व कैदी बांधवांना मार्गदर्शन, पोलिस विभाग मार्गदर्शन, परिचारिकांना मार्गदर्शन या सामाजिक उपक्रमातूनही जीवनविद्येचे कार्य सुरू आहे.

आनंदाची गोष्ट म्हणजे २०२३ हे वर्ष ‘जीवनविद्या मिशन’ श्री सद्‌गुरूंचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. या निमित्त संस्थेने प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संकल्प हाती घेतले आहेत… ‘विश्वप्रार्थना घरोघरी..’ हा यापैकी पहिला संकल्प आहे.. सद्‌गुरूंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना हा एक महान शोध आहे. सर्वांना सर्वांचा विचार करायला लावणारी, शुभविचारांनी परिपूर्ण अशी ही विश्वप्रार्थना श्री सद्‌गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त पाच लाख नवीन कुटुंबापर्यंत पोहचविण्याचा जीवनविद्या मिशनचा मानस आहे. तसेच दुसरा संकल्प आहे ‘प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’..

श्री सद्‌गुरूंनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च महत्त्व दिलंय. म्हणूनच जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रहिताची प्रेरणा प्रत्येकात निर्माण करण्यासाठी जीवनविद्या मिशन प्रयत्नरत आहे. या दोन व्यापक संकल्पातून वैचारिक क्रांती घडवीत विश्वशांतीचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणं हीच नामधारक शिष्यांकडून आपल्या प्रेमळ श्री सद्‌गुरूंना दिलेली खरी गुरूदक्षिणा असेल.

‘जीवनविद्या मिशन’च्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती

गर्भसंस्कार अभ्यासक्रम

विद्यार्थी कोर्स : उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा

तरूण वर्गासाठी अभ्यासक्रम :

वय १५ ते २१ : सोळावं वरीस मोक्याचं

तरूण वर्गासाठी अभ्यासक्रम :

वय २२ ते ३० : तरूणांनो करा सोने आयुष्याचे

कौटुंबिक सौख्य अभ्यासक्रम

पॅरेंटिग कोर्स

कॉर्पोरेट कोर्स : एन्जॉय स्ट्रेस आणि तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात

स्वानंद योग अभ्यासक्रम

लेव्हल १ - फाउंडेशन कोर्स

लेव्हल २ - जीवन जगण्याची कला

लेव्हल ३ - प्रवास उत्कर्षाचा

लेव्हल ४ - मनःशांती साधना शिबिर

लेव्हल ५ - शोध परमेश्वराचा

लेव्हल ६ - दिव्यबोध आणि भावस्मरण

लेव्हल ७ - दिव्यसाधना

इंग्रजी कोर्स : Jeevanvidya’s Spiritual Wisdom in day to day life and Corporate life

हिंदी कोर्स : आपका उत्कर्ष आपके हात

याचप्रमाणे श्री प्रल्हाद पै आज सेमिनार्स, कॉन्फरन्स कॉल, सच्चिदानंद स्वरूप प्रवचने, समाज प्रबोधने, व्याख्याने अशा विविध अंगाने जीवनविद्येच्या कार्याचा प्रचार प्रसार करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com