शक्ती मिल बलात्कार प्रकरणी फाशीच योग्य 

ऊर्मिला देठे
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाउंडमध्ये 2013 मध्ये फोटो जर्नालिस्ट महिलेसह आणखी एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने बुधवारी (ता. 27) उच्च न्यायालयात सादर केले आहे. 

बलात्कार हा घृणास्पद गुन्हा आहे. अशा घटनांनंतर महिलेला शारीरिक आणि मानसिक धक्का बसतो. यातून बाहेर पडणे संबंधित महिलेला अतिशय अवघड जाते. त्यातच आरोपीने हा गुन्हा वारंवार केला असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा देणे गरजेचे आहे, असे मत सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे व्यक्त केले आहे. 

शक्ती मिल कंपाऊंड सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376(ई) च्या घटनात्मक वैधतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत याचिका दाखल केली आहे. त्यावर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्र सरकारने वरील मुद्दे मांडले आहेत. 

सत्र न्यायालयाने 5 एप्रिल 2014 रोजी या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. फोटो जर्नालिस्ट महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद आणि त्याबाबतच्या कलमांमध्ये दुरुस्ती होण्यापूर्वीच आपल्याला देहदंडाची शिक्षा ठोठावल्याचा बचाव आरोपींनी केला आहे. सत्र न्यायालयाचा हा निकाल म्हणजे कार्यकक्षेबाहेर जाऊन दिलेला निर्णय आहे, असा युक्तिवादही दोषींच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. 

या तीन आरोपींनी या घटनेपूर्वीही आणखी एका महिलेवर बलात्कार केला असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने या तिघांना देहदंड; तर सिराज खानला आधीच्या गुन्ह्यात सहभागी नसल्याने जन्मठेप ठोठावली होती. पाचवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविले आहे. 

पश्‍चात्ताप नाही 
शक्ती मिलमध्ये फोटो जर्नालिस्ट महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी आणखी एका महिलेशी असाच प्रकार केलेल्या तीन आरोपींना या कृत्याचा जराही पश्‍चात्ताप वाटत नाही. त्यामुळे या दोषींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

Web Title: Shakti Mills rape case hanging right