- बाळासाहेब पाटील
मुंबई - शेतजमिनीची रणभूमी झाली तरी बेहत्तर आम्ही शक्तिपीठ महामार्ग करू देणार नाही, असा एल्गार शक्तिपीठ महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. सोमवारी (ता. १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे काम पुढे सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यभरातून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.