"आपल्याच कोयनेचं पाणी घेऊन ..." शंभुराज देसाई यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार Maharashtra Karnatak Border | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

Maharashtra Karnatak Border : "आपल्याच कोयनेचं पाणी घेऊन ..." शंभुराज देसाई यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न धुमसत असताना कर्नाटकने नवीन कुरापत केली आहे. सांगली जिल्ह्यातील जात तालुक्यावर कर्नाटक आता दावा सांगण्याच्या तयारीत आहे. यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सीमा प्रश्नी राज्य सरकारने बैठक घेतली. त्याचा विस्तार केला त्या समितीची बैठक घेतली. दोन तास ही बैठक झाली आहे. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्याना आमंत्रित केलं होतं. यावेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती केली. या मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर रोजचा फॉलो अप या मंत्र्यांनी करायचा आहे.

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, वैद्यनाथण नावाची जी कमिटी आहे. त्यांच्याशी चर्चा करून याआधीची जी कमिटी आहे त्यांच्यासोबत चर्चा करायची अॅड. शिवाजीराव जाधव यांच्या संपर्कात राहायचं. या सर्व कामांना गती देण्याचं काम सरकारने केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जी 850 गाव आहेत. ज्यांची आजही भूमिका आहे की, आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचं आहे. आणि आम्ही महाराष्ट्रातच आहोत. यांच्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढं टाकलं आणि आता महाराष्ट्र गतीने पुढं जात आहे. इतकच नाही तर या 850 गावांना शैक्षणिक सुविधा, इतर नागरी सुविधा, वैद्यकीय मदत, आंदोलकांना मिळणारी पेन्शन हे सर्व निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले. यामुळे कर्नाटकची जनता तिथल्या सरकारला प्रश्न तिथल्या मुख्यमंत्र्यांना विचारेल म्हणून या खोडी काढण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Karnataka: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वाद सुरू असतानाच कर्नाटकची नवी कुरापत

दरम्यान 15 वर्षापूर्वी जेव्हा जतच्या भागामध्ये 40 50 गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न बिकट होता. त्यानंतर हा प्रश्न पुढे आला होता. असेच जूने प्रश्न उकरून काढायचे आणि ही महाराष्ट्रातली येत आहेत. आणि असा दावा सुप्रीम कोर्टासमोर सांगायचा हा केविलवाणा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. आपण अत्यंत अभ्यासपूर्ण या सीमाप्रश्नावर पुढं जात आहोत. शिंदे फडवणीस सरकारच्या सक्त सूचना आहेत की, यामध्ये कोणत्याही कमतरता राहू नये. आपली सत्याची आणि पूर्ण बाजू कोर्टापुढे आली पाहिजे या दृष्टीने यांचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा हास्यास्पद आहे. त्याला किंचितही महत्व देण्याची गरज नाही आपल्याच कोयनेच पाणी घेऊन आपल्याच गावांवर हक्क सांगत आहे असंही देसाई यावेळी बोलताना म्हणाले आहेत.