यंदा राज्यसभेतल्या ७१ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. वर्षभरात चार टप्प्यात खासदार निवृत्त होणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातल्या ७ जणांचा समावेश आहे. तर भाजपच्या तब्बल ३० खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. पाच राज्यात विधानसभा निवडणूक यंदा होणार असून या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदारांची निवृत्ती आणि निवडणूक महत्त्वची ठरणार आहे.