शरद पवार यांचे 80व्या वर्षात पदार्पण; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृतज्ञता कोश प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार गुरुवारी (ता. १२) ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

शुभेच्छांचे लक्षवेधी फलक
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar birthday celebration