

Sharad Pawar’s One-Line Reply Ends Speculation on MNS Tie-Up
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. या निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी, एकत्र मोर्चाही बघायला मिळाला. मतचोरीच्या मुद्द्यावर एकत्र येत भाजपसह निवडणूक आयोगावर टीकाही ठाकरे बंधूंनी केली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेसुद्धा सोबत येणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र काँग्रेसचा याला विरोध असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.