कोल्हापूरच्या निकालानं माझी काळजी वाढविली; शरद पवारांचा चंद्रकांतदादांवर कडवा वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar vs Raj Thackeray

'कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठविण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केलाय.'

कोल्हापूरच्या निकालानं माझी काळजी वाढविली : शरद पवार

कोल्हापूर : या देशात अनेक राजे होऊन गेलेत. चंद्रगुप्त मौर्यचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अदिलशाहाचं राज्य येऊन गेलं. अनेकांची राज्य येऊन गेली. पण, 300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरण:त छत्रपती शिवाज महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव अढळ आहे. जिजाऊंच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांनी चोहुबाजूंनी सर्व मुघल साम्राज्यांशी लढले, समाजातील सर्व घटकांचा विचार केला. आज देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आलीय. भाजपा जिथं-जिथं सत्तेत आली, तिथं-तिथं अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय.

राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले, परंतु सामान्यांची सेवा कधी सोडली नाही. या कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठविण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केला. कोल्हापूरचा निकाल लागला आणि माझी काळजी वाढली, कोल्हापुरच्या निकालानं देशात संदेश गेला, असं पवार म्हणाले.

हेही वाचा: 'शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात आहे, हे कुणी सांगायची गरज नाही'

देशाला दिशा देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारमध्ये आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे वीज मंत्री होते, त्यांनी आपला देश पुढे नेण्यासाठी एक संकल्पना मांडली. विजेच्या ग्रीडची. ज्या राज्यांमध्ये जास्त वीज आहे, त्या राज्यांची वीज कमी वीज असलेल्या राज्यांना जोवर वळविली जात नाही, तोवर या राज्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यांनी देशाला ग्रीडची भेट दिली, निर्णय घेतला, असंही पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar Criticism Of Chandrakant Patil At Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top