Sharad Pawar in Pune : शरद पवारांची पुन्हा अजित पवार गटावर टीका; ''विकासासाठी गेल्याचं सांगतात, पण...''

Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal

पुणेः पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. आपल्यातले काही लोक विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगतात, परंतु त्यात काही तथ्य नसल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी कांद्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं. कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. जगातील मार्केट केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बंद केलं. याला विकास म्हणत नाहीत. मागील सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक कारखाने गुजरातला गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी हुकल्या. सध्याचं महाराष्ट्र सरकार राज्याच्या हिताचे निर्णय घेत नाही.

Sharad Pawar vs Ajit Pawar
ISSF World Championships : भारताने जागतिक नेमबाजी स्पर्धेत पटकावले तिसरे सुवर्ण

''आपल्यातील काही लोक विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगतात. परंतु त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही'', अशी टीका शरद पवारांनी अजित पवार गटावर केली. शरद पवार आणि अजित पवार यांची मागच्या आठवड्यात पुण्यात भेट झाली होती. ही गुप्त भेट माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर सगळ्यांनी भेट कबूल केली.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Anahat Singh Squash Championships : अवघ्या 15 वर्षाच्या अनहतने भारताला स्क्वाशमध्ये मिळवून दिलं सुवर्ण पदक

त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांनी अजित पवार गटावर हल्ला केला. पवारांच्या अशा भूमिकांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचं आघाडीतील घटकपक्षांना वाटत आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांनी थेटपणे भाष्य करत शरद पवारांनी संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर बीडमध्ये आणि आज पुण्यात शरद पवारांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com