कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात पवारांची एन्ट्री; जत मागणाऱ्या बोम्मईंना दिलं त्यांच्याच शब्दांत उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Basavaraj Bommai

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात पवारांची एन्ट्री; जत मागणाऱ्या बोम्मईंना दिलं त्यांच्याच शब्दांत उत्तर

राज्यपालांनी सगळ्याच मर्यादा सोडल्या आहेत. त्यामुळं राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीच दखल घ्यावी. अशी वक्तव्य करणाऱ्यांकडं मोठी जबाबदारी देणं योग्य नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं.

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी (बसवराज बोम्मई) मागणी केली आहे, तशी मागणी आम्हीही करतो. आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी मागतो. त्याठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आहेत. त्यामुळं बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तर चर्चा शक्य आहे, असं प्रत्युत्तर पवार यांनी बोम्मईंना दिलंय.

हेही वाचा: जतनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यावर दावा; देवेंद्र फडणवीसांनाही थेट चॅलेंज

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य शहाणपणाचं लक्षण नाहीये. त्याला आमचा पुरेपुर पाठिंबा नाही. सध्या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कसंही वागा, कशाही पध्दतीची भूमिका घ्या असं त्यांचं चाललंय, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka Border) 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Karnataka CM Basavaraj Bommai) केलाय. सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोम्मईंना प्रत्युत्तर दिलंय.