esakal | मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं शरद पवारांकडून अभिनंदन! म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

fadnavis -pawar

मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! - शरद पवार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं', असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. "मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! चार वेळा मुख्यमंत्री होते, हे माझ्याही लक्षात नाही, ही माझी कमतरता असून मी आजही मुख्यमंत्री आहे या फडणवीसांच्या वक्तव्याचा पवारांनी समाचार घेतला. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

'गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांशी बोलतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला जनतेनं कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. त्यामुळं मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करतोय. ज्या दिवशी जनतेचा आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन,' असंं फडणवीस म्हणाले होते.

केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे - शरद पवार

केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सीमाप्रश्नावरही आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा: एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

मावळ गोळीबाराप्रकरणी देवेंद्र फडणवीसानां शरद पवारांचे प्रत्त्युतर

मावळ गोळीबाराला जालियनवाला बाग म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही शरद पवार यांनी प्रत्त्युतर दिलं. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिसच जबाबदार आहेत. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

केंद्रीय यंत्रणेपेक्षा मुंबई पोलिसांनी आधिक ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीपेक्षा मुंबई पोलिस आधिक कार्यक्षम आहेत. कुणी शंका घेऊ नये, अशी मुंबई पोलिसांची कारवाई असते.

एनसीबीनं पंच म्हणून निवडलेले गोसावी अनेक वर्षांपासून फरार

केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईचा सत्तेसाठी गैरवापर केला जातोय.

चार वेळा मुख्यमंत्री होते, हे माझ्याही लक्षात नाही, ही माझी कमतरता - मी आजही मुख्यमंत्री आहे या फडणवीसांच्या वक्त्याचा पवारांनी घेतला समाचार

मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो - पवार

सत्तेत नसल्याचा आजही त्यांना विश्वास नाही, शरद पवारांचा भाजपला टोला

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग या पोलिस आधिकाऱ्याचा पत्ता नाही.

लखीमपूर हिंसाचाराबद्दल बंद पाळल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं अंत:करणापासून आभार

यंदा आणि पुढच्यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन दुप्पट होईल

हेही वाचा: खूशखबर! 'या' दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये येणार

loading image
go to top