
मध्यावधी निवडणूकीला तयार राहा; शरद पवारांचे आमदारांना आदेश
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने आज एक मोठी लढाई जिंकली, आज पार पडलेले विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीच भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आहेल आहेत, यादरम्यान शिंदे-फडणवीस सरकारची उद्या म्हणजेच सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
आज झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. डिसेंबर मध्ये मध्यावधी निवडणूक होईल, असे संकेत शरद पवार यांनी यावेळी दिले. तसेच या निवडणूकीसाठी तयार राहा असे निर्देश देखील पवारांनी दिले आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे. हे शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? हा देखील प्रश्न असल्याचेही पवार या बैठकी दरम्यान म्हणाले. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जावे ,काम करत राहावे. निवडणूक लागल्या तरी तयारी असावी, यासाठी आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असे आदेश पवार यांनी आमदारांना दिले.
हेही वाचा: Video : बंडखोर यामिनी जाधव उभ्या राहताच विधानसभेत EDच्या घोषणा
अजित पवार विरोधीपक्षनेते?
विरोधी पक्षनेते पदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
हेही वाचा: काँग्रेसनं बंडखोर आमदारांना शहाजी पाटील स्टाईलनं डिवचलं; म्हणे, ५० खोके...
Web Title: Sharad Pawar Instructed Ncp Mla To Be Ready For Mid Term Elections Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..