Sharad Pawar : पवार म्हणाले, "राष्ट्रवादीचे नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?"; अन्...

ठाकरे मुख्यमंत्री का झाले हे सांगताना ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde
Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath ShindeSakal

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातल्याने सावंत यांनी म्हटलं आहे.

अरविंद सावंत म्हणाले,"शरद पवार म्हणाले होते, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन माजी मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, जयंत पाटलांसारखे दिग्गज नेते आहेत, ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं होतं. पण तरीही पवारांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाची गळ घातली."

Sharad Pawar Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray : '...याला बापसुद्धा दुसऱ्याचा लागतो' उद्धव ठाकरेंकडून टोकाची टीका

अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून सध्या राज्यभर सभा घेतल्या जात आहेत. याची सुरुवात काल छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या सभेतून झाली. दरम्यान, कालच शिंदेंची शिवसेना आणि भाजपाने सावरकर गौरव यात्रा काढली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com