Sharad Pawar's Election Strategy Meeting
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Sharad Pawar : मूळ ओबीसींना प्राधान्य द्या! शरद पवार यांचे मुंबईतील बैठकीत आवाहन
Sharad Pawar's Election Strategy Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य देऊन, उमेदवार न मिळाल्यास कुणबी प्रमाणपत्रधारकांना उमेदवारी देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्याना दिल्या.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, जर मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्रधारक उमेदवाराचा विचार करावा, अशा सूचना दिल्याची माहिती आहे.

