Sharad Pawar: महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय शिकवला जाणार असल्यानं त्याविरोधात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. यासाठी ५ जुलै रोजी मुंबईत मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचा आणि त्यांच्या पक्षाचा सहभाग महत्वाचा असणार आहे. या दोन्ही भावांना आता शरद पवारांच्या राष्ट्रावादीनं देखील पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवारांनी याबाबत पक्षाचं धोरणं नेमकं काय हे स्पष्टही केलं आहे.