''इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचं बाबासाहेबांचं योगदान" | शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

''इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचं बाबासाहेबांचं योगदान"

नाशिक : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. दरम्यान राजकीय वर्तुळातून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

नव्या पिढीला इतिहास साध्या भाषेत समजावण्यासाठी काम केलं

शिवशाहीर बाबासाहेब यांनी नव्या पिढीला इतिहास साध्या भाषेत समजावण्यासाठी काम केलं. इतिहासासंबंधी नव्या पिढीत आस्था निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं, त्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले. बाबासाहेब दीर्घायुषी होते, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली. शिवछत्रपतींच्या इतिहासावरून काही वादही झाले, मात्र त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्याबद्दल अशा बदनाम्या केल्या जाता ते यांच्या बाबतही घडलं असावं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला, मात्र त्यात काही वादग्रस्त मुद्दे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते देशभरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शरद पवार यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाबाबत आस्था निर्माण करण्याचं योगदान दिलं. ते आपण विसरू शकत नाही. त्यांनी शिवरायांच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातल्याचं वक्तव्य केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्या संदर्भात भाष्य करण्यास मी जाणकार नाही. त्या संदर्भातला मी तज्ज्ञ नाही. त्यांनी एक मोठी कामगिरी केली. शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्यांच्याबद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं. त्यात उणीव काढण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. ते ही त्यांच्या बाबतीत घडलं.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी केली गेली. हे सगळं खरं असलं तरी....

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काम पुढे घेऊन जाण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी केली गेली. हे सगळं खरं असलं तरी इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचं त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाही. त्यांचं कार्य पुढे कसं सुरू रहावं, यावर मी भाष्य करणार नाही. यात वेगवेगळी मतं आहेत. मला यात पडायचं नाही.

loading image
go to top