राहुल गांधींच्या भाजपकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

Sharad Pawar, Rahul Gandhi and Narendra Modi
Sharad Pawar, Rahul Gandhi and Narendra Modi

मुंबई : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी झडत असताना याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

Sharad Pawar, Rahul Gandhi and Narendra Modi
Vedanta & Foxconn: वेदांता प्रकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

"वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचं आमिष केंद्र सरकारकडून दाखवलं जात आहे. मात्र याला काही अर्थ नाही. ही तर लहान मुलांची समजूत काढल्यासारखं आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही" असं शरद पवार म्हणाले आहेत.

यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादवर विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांना लोकांची चांगली साथ मिळतेय हे मला सहकाऱ्यांकडून कळलं आहे. मात्र त्यांना नाव ठेवणं, बर वाईट बोलणं हा समान अप्रोच देशातील एका पक्षाचा होता. त्या पक्षाला इतर पक्षांच्या नेतृत्वाबद्दल सुसंस्कृतपणाने कसं बोलावं याची समज नसावी. त्यामुळे राहुल गांधींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टिंगलटवाळी करण्यात येत आहे. तुम्ही धोरणावर टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, पण नावावरून टीका करणे पोरकटपणा असल्याचं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar, Rahul Gandhi and Narendra Modi
शिंदेंनी अजितदादांना मुख्यमंत्रीपद द्यावं, आम्ही त्यांना...; सुप्रिया सुळेंची 'ऑफर'

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत राहुल यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र या यात्रेत राहुल गांधी यांनी परिधान केलेलं टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला होता. यावरून भाजपने काँग्रेसवर कडाडून टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com