इथेनॉलसाठी योजनाबद्ध कार्यक्रम हवा : शरद पवार | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
इथेनॉलसाठी योजनाबद्ध कार्यक्रम हवा : शरद पवार

इथेनॉलसाठी योजनाबद्ध कार्यक्रम हवा : शरद पवार

पुणे : जागतिक, देश आणि राज्य स्तरावर साखरेचे अधिक उत्पादन (Sugar Production) होणार असून, साखरेच्या जागतिक किमतीवर याचा परिणाम होणार आहे. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारकडून साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादन (Ethanol Production) वाढीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम योजनाबद्ध पद्धतीने राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

मांजरी येथे मंगळवारी आयोजित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

पवार म्हणाले, की २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन १८२.८७ दशलक्ष टन होणार असून, हे गतवर्षीपेक्षा ३.७९ दशलक्ष टनांनी जास्त आहे. भारतामध्ये या हंगामात ३०५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, सुमारे ३४ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाईल.

पारितोषिक वितरण स्थगित

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत उत्कृष्ट साखर कारखान्यांना दरवर्षी पारितोषिके जाहीर करून वितरित करण्यात येतात. कोरोनामुळे यंदाची वार्षिक सभा ऑनलाइन घेण्यात आली. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top