Pahalgam Attack : केंद्राच्या भूमिकेला पाठिंबा, पहलगाम हल्ल्यानंतरचा निर्णय घेताना दक्षता घेण्याची सूचना : शरदचंद्र पवार

National Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य असला तरी, त्याचे परिणाम भारतावर होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मत शरद पवार यांनी आंबोली येथे मांडले.
Pahalgam Attack
Pahalgam Attack Sakal
Updated on

आंबोली : ‘‘जम्मू-काश्मीरमधील पहलगाम बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारबरोबर असले पाहिजेत. परंतु, सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com