sharad pawar
sharad pawarsakal

राष्ट्रवादी निवडणुकीसाठी तयार; पण कोर्टाच्या निकालावर पवारांची चिंता

कोर्टाच्या या निर्णयामुळे हा मोठा वर्ग सत्तेच्या बाहेर फेकला जाईल असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करायला पाहिजे पण त्यांच्या दौऱ्यात कुठं जायचं हा त्यांचा निर्णय असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत आम्ही तयार असल्याचं सूतोवाचही पवारांनी यावेळी केलं आहे. नाशिक मध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर न्यायालयाच्या आरक्षणाच्या निकालाआधी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याच्या कोर्टाच्या निर्णयावर पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा मोठा वर्ग सत्तेच्या बाहेर फेकला जाईल असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

sharad pawar
धक्कादायक: मुंबईतील गोवंडीत एकाच घरात आढळले चार मृतदेह, तपास सुरू

एखाद्या राज्यात नवं सरकार स्थापन झालं तर नवे निर्णय घेणं हे साहजिकच आहे पण एखादे चालू प्रकल्प थांबवणं अयोग्य असल्याचं पवारंनी म्हटलंय. त्याचबरोबर राज्यातील राजकीय बांधणी विस्कळीत झालेली नसून ज्यावेळी राज्यातील जनतेचा कौल घेण्याची वेळ येईल त्यावेळी सर्व व्यवस्थित होईल. दरम्यान राज्यात दोनच मंत्र्यांच्या जीवावर काम चाललंय. त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे असं चाललंय असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कोर्टाने काल स्पष्टीकरण देत ओबीसी आरक्षणाच्या आधी जाहीर झालेल्या निवडणुकामध्ये आरक्षण लागू होणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विचार करण्याची याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हे सरकारचं अपयश म्हणत काहींनी शिंदें सरकारवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com