Sharad Pawar Praful Patel Meeting Video
esakal
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये १० नोव्हेंबरनंतर दोघेही एकत्र बसून चर्चा करणार असल्याचं शरद पवार सांगताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.