Manmohan Singh: ''शेतकरी आत्महत्येची बातमी ऐकताच मी अन् मनमोहन सिंग विमानाने विदर्भात गेलो...'' शरद पवारांनी सांगितलेली आठवण

Manmohan Singh and Sharad Pawar Vidarbha visit after farmer crisis: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. 2004 ते 2014 या कालावधीत ते देशाचे पंतप्रधान होते. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.
sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

भारताचे माजी पंतप्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री व जगातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. आपल्या दहा वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक असे निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय जनतेचे आयुष्य बदलून गेलं. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान काळातील एक किस्सा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेठिकाणी सांगितला होता.

गेल्या वर्षी महाविकास आघाडीतर्फे पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी पवारांनी शेतकरी प्रश्नावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धारेवर धरलं.

यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अशोक पवार, संजय जगताप, रविंद्र धंगेकर, जगन्नाथराव शेवाळे, पक्षाचे नेते मोहन जोशी, अंकुश काकडे, माजी आमदार महादेव बाबर, प्रशांत जगताप, माजी मंत्री बाबासाहेब शिरोडकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, शेतकरी अस्वस्थ आहे. १० दिवसात यवतमाळ, अमरावती, वाशिम, वर्धा या ठिकाणी २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बळीराजा देशाची भूक भागवणारा, काळ्या आईशी इमान राखणारा आत्महत्या करतो. मला आठवतं, पहिल्या आठवड्यात नागपूर आणि यवतमाळला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली तेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना मी सांगितलं, शेतकरी आत्महत्या करतो ही लहान गोष्ट नाही.

sharad pawar
क्रिकेट खेळल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायला अन्...; दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हर्ट अटॅकने मृत्यू

''आपण दोघांनी गेलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ही टोकाची भूमिका का घेतली? प्रधानमंत्री जनतेच्या प्रश्नासंबंधी आस्था ठेवणारे होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिल्लीतून विमान काढले नागपूरला आलो तिथून यवतमाळला पाहणी करायला गेलो; ज्यांच्या घरात आत्महत्या केली गेली त्यांच्या घरात गेलो, त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हते, विचारलं काय झालं? सावकाराकडून पैसे काढले होते, बँकेतून पैसे काढले होते दुष्काळी स्थिती आली. हाता-तोंडातलं पीक गेलं आणि त्या सावकार आणि बँकेने घरादाराचा लिलाव काढला त्यांना एकच दुःख झालं की, माझी भांडीकुंडी बाहेर काढून घराचा लिलाव होतो, काय माझी किंमत लोकांमध्ये राहणार त्यामुळे बाहेर जाऊन विषाची बाटली घेतली घटाघटा प्यायलेत आणि जीव गेला.''

sharad pawar
Vinesh Phogat: विनेश फोगाटने परत केला अर्जुन आणि खेलरत्न; कर्तव्य पथावर ठेवले पुरस्कार

शरद पवार पुढे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी संकटात, दूध संघटना संकटात, सोयाबीन, कापूस शेतकरी संकटात हे सर्व पाहता जगावे कसे हा प्रश्न आहे. आता आणि हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचे सरकार हे ढुंकून पाहायला तयार नाही. कृषीप्रधान देश आणि देशाला कृषिमंत्री नाही; कसा देश चालणार? पण, या देशाच्या शेतकऱ्यांनी कोट्यवधी लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवला. मी कृषी मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पहिलेच पत्र आलं की, अमेरिकेवरून एवढे धान्य आपल्याला देशात आणायचे आहे त्यासाठी सही करावी लागेल, तेव्हा मी म्हणालो की, शेतीप्रधान देश आणि धान्य हे परदेशातून आणायचे.

''प्रधानमंत्र्यांनी सांगितलं फाईलवर सही करा. नाईलाजाने तेव्हा सही करून परदेशातून धान्य आणले गेले; तेव्हाच मी निर्धार केला की, हे चित्र बदलायचे आणि बदललं देखील; शेतीमालाची किंमत कमी केली, खताच्या किमती कमी केल्या, त्याच्या डोक्यावरच ओझं कमी केलं, कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढे धान्य या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या १८ देशांना धान्य निर्यात करण्याचे काम याच बळीराजांनी केले. एवढे कर्तृत्व, एवढी मेहनत, एवढी बांधीलकी ही शेतकऱ्याची आहे आणि आज हे सरकार त्यांच्याकडे ढुंकून पाहायला तयार नाही.'' अशा शब्दात पवारांनी सरकारचा समाचार घेतला.

मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटर वर लिहिलेल्या शोकसंदेशात ते म्हणतात,

"भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो ! "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com