Sakal Impact : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत तारांकित प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

Sakal Impact : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत तारांकित प्रश्न

राहुरी विद्यापीठ : राज्यातील कृषी विद्यापीठातील (Rahuri krishi Vidyapeeth Recruitment) भरती प्रक्रिया गेल्या पाच ते दहा वर्षांपासून रखडलेली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठातील संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याबद्दल (university educational expansion) मागे पडलेले दिसून येत आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभाच्या दिवशी राज्यपाल ना. भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari), केंद्रीय परिवहन मंत्री न नितिन गडकरी (nitin gadkari), माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (sharad pawar), राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (dada bhuse) हे राहुरी कृषी विद्यापीठात होते, त्याच दिवशी दैनिक सकाळच्या विद्यापीठाच्या रिक्त पदांबद्दलचे वृत्त प्रकाशित (sakal news impact) झाले होते. या बातमीची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.

ऑक्टोबर २०२१ अखेर राज्यामधील चारही कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक वर्गीय व शिक्षकेतर एकूण १२४७७ मंजूर पदांपैकी केवळ ६६३५ स्पर्धेत भरलेले आहेत व ५८४२ पदे (सुमारे ४६.८२ टक्के) पदे पर्यंत रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे, हे खरे आहे काय ?

रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केलेली आहे ? तसेच या बाबत विलंब होण्याची काय कारणे आहेत ? याबाबत खुलासा करण्याचे आवाहन सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, अब्दुल्लाखान दुर्रानी यांनी कृषिमंत्री ना. दादा भुसे यांना खुलासा मागितला आहे. या तारांकित प्रश्नाबाबत कृषी परिषदेकडून व सर्व कृषी विद्यापीठाकडून सविस्तर माहिती राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी रंजना गवारी यांच्याकडून मागविण्यात आलेली आहे. येथे दहा तारखेला कृषिमंत्री काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ब्लॉक : विद्यापीठाची अधिस्वीकृती तसेच घसरलेले मानांकन पाहता विद्यापीठातील पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक संवर्गातील मंजूर पदे २३१९ आहेत, यामधील सुमारे ११०० पदे सध्या रिक्त आहेत. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६० करण्यासाठी शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे ही विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Sharad Pawar