Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टिकेला शरद पवार यांनी जळगाव येथे बोलताना उत्तर दिले.
Sharad Pawar on Narendra Modi
Sharad Pawar on Narendra Modiesakal

Sharad Pawar on Narendra Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. शरद पवार यांनी स्वत:च कुटुंब सांभाळलं नाही ते महाराष्ट्र काय सांभाळतील, असे मोदी म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्याबाबत जनतेमध्ये आस्था कमी होत आहे. त्यांचा स्वभाव बेछुट पणे बोलण्याचा आहे. मग ती गोष्ट झेपेल की नाही, सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? याबाबत ते कधीच विचार करत नाहीत. त्यांनी २०१४ ला जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्णयांवर टीका केली. पण तेच निर्णय आज नरेंद्र मोदी स्वत: राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विरोधाभास लोकांना दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना कुटुंब सांभळता येत नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी कुठं कुटूंब सांभाळलं आहे. त्यांची पार्श्वभूमी देखील चिंताजनक आहे. पण मी त्या स्तरावर जाऊन बोलणार नाही. असं व्यक्तिगत बोलू नये असं मला वाटतं. हे पथ्य मोदींनी पाळलं नाही म्हणून आपणही पाळायचं नाही, असं वागणं योग्य नाही"

Sharad Pawar on Narendra Modi
Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

उद्धव ठाकरे यांनी संकटात मदत करणारा पहिला व्यक्ती मी होतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये, असे शरद पवार म्हणाले.

लोकसभेत काँग्रेसला १० ते १२ आमि राष्ट्रवादीला ८ ते ९ जागांवर विजय मिळेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान कितीवेळा महाराष्ट्रात येतोय. यापूर्वी आम्ही कोणत्याही पंतप्रधानाला इतक्या वेळा महाराष्ट्रात येताना पाहिले नव्हते. मोदींचा हा तिसरा-चौथा राऊंड आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, त्यांना विजयाबद्दल विश्वास नाही, असा टोला देखी शरद पवार यांनी लगावला. 

Sharad Pawar on Narendra Modi
Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com