
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेला त्यांच्याच पक्षातून जोरदार विरोध होताना दिसत आहे. पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी अक्षरशः रडत राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. असाच एक किस्सा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही संदर्भातला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनीही दिला होता राजीनामा
१९७८ साली विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेना फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही फार काही चांगली कामगिरी झाली नाही. शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. बाळासाहेबांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ही घोषणा शिवाजी पार्क इथं झालेल्या सभेत करण्यात आली.
यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच असंतोष उसळला. सर्वांनी मिळून नाही नाही, असं ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या हलकल्लोळानंतर आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर बाळासाहेब ठाकरेंनी राजीनामा मागे घेतला.
घराणेशाहीचा आरोप असह्य झाला अन्...
साधारण १९८५ नंतर शिवसेनेत ठाकरेंच्या नव्या पिढीचा सहभाग वाढला. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे आणि चिरंजीव उद्धव ठाकरे सुद्धा संघटनेमध्ये सक्रिय झाले होते. याच कारणामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ होऊ लागले.
अशातच १९९० च्या निवडणुकीत प्रचारात जोर लावून देखील शिवसेनेच्या पदरी अपयश आलं. त्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. यामुळे शिवसेनेत धुमसत असलेले भांडण चव्हाट्यावर आलं. ते शिवसेनेत घराणेशाही आणत आहेत, असा खुला आरोप माधव देशपांडे यांनी केला. ते असेही म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर उभ्या असलेल्या शिवसेनेचा विनाश बाळासाहेब करत आहेत. हा आरोप सहन न झाल्याने बाळासाहेबांनी राजीनामा दिला.
त्यानंतर काही दिवस बाळासाहेब शांत राहिले. आणि त्यांनी सामनानधून एक अग्रलेख लिहला. तो वाचून अनेक कार्यकर्ते रडले. भराभर मातोश्रीसमोर कार्यकर्ते जमू लागले. आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी बाळासाहेबांनी सभा घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.