Sharad Pawar : 'पवार साहेब तुम्ही आम्हाला हवे आहात!' कार्यकर्त्यांना रडू कोसळले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता आपण राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याविषयी घोषणा करताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar NCP Supremo Political Retirement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता आपण राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याविषयी घोषणा करताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. कार्यकर्त्यांना मोठा धक्काही बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलून दाखवले.

पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पवारांना भावनिक साद घालत पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याविषयी सांगितले. कित्येक कार्यकर्त्यांना रडू आले. त्यांनी देखील पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशना दरम्यान झालेल्या त्या प्रसंगानं अनेकांना धक्का बसला आहे. पवार यांनी एकुणच आपल्या आतापर्यतच्या राजकीय परिस्थितीचा मागोवा घेत येत्या काळात आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणे अधिक उचित असेल. अशा आशयाचे विधान केले होते. पवारांचे भाषण संपताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

Sharad Pawar
शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार काय म्हणाले?

पवार साहेब असं करु नका, निवृत्ती घेऊ नका, तुम्ही जोपर्यत निवृत्तीचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यत आम्ही सभागृह सोडणार नाही. अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली. अजित पवारांनी देखील एक कमिटी नेमून त्यात चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. मात्र कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. पवार यांनी आताच हा निर्णय मागे घ्यावा. अशी भूमिका घेतली होती.

Sharad Pawar
Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध! घोषणाबाजीनं दणाणून सोडलं सभागृह

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राजकीय जीवनातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यकर्त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : "उद्धवदेखील सक्रिय होते परंतु.." कोरोना काळात मविआ सरकारच्या कामगिरीचे श्रेय पवारांनी दिले 'या' नेत्याला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com