Sharad Pawar : वाय.बी. सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात...

Sharad Pawar : वाय.बी. सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात...

मुंबईः मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे.

२ मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. आज साडेपाच वाजता शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र आता त्यापूर्वीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरु झाला आहे.

Sharad Pawar : वाय.बी. सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात...
Raj Thackeray : ...जेव्हा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंच्या शाळेत पोहोचले; राज यांनी सांगितली आठवण

मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर नेते नाचत आहेत. ढोल-ताशांचा गजर सुरु आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार, हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्याची अधिकृत घोषणा काही वेळातच होईल. सूत्रांच्या माहितीनुसार २०२४ पर्यंत पवारांनीच अध्यक्ष व्हावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com