शरद पवार आणि संजय राऊतांची बैठक, नेमकी काय होणार चर्चा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Sanjay-Raut

शरद पवार आणि संजय राऊतांची बैठक, नेमकी काय होणार चर्चा?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं (Sharad Pawar) बैठकींचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. सोमवारी त्यांनी अनिल परबांसोबत (Anil Parab) बैठक घेतली होती. आज पुन्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये शरद पवार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात बैठक आहे. यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.

हेही वाचा: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण - शरद पवार

खासदार संजय राऊत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची नुकतीच निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतरची ही पहिलीचं बैठक आहे. त्यावरच चर्चा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये बैठक घेण्यात येत आहे. बैठकीसाठी माजी आमदार विद्या चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, प्रताप आसबे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.

ऑक्टोबर महिन्यात मुंबई मराठी ग्रंथ संगहालय निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार हे प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात 29 मतं शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली होती. शरद पवार यांचा मोठा विजय झाला होता. तर या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रतीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा विजय झाला होता. दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता. आता याच ग्रंथालयाची निवडणूक पार पडल्यानंतर पहिलीच बैठक घेण्यात येत आहे.

loading image
go to top