स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षीय बलाबल आणि सहकारी पक्षांसोबत कशा पद्धतीने पुढे वाटचाल करायची याबाबत बैठक पार पडली. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.