''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar says organisation creates problems and govt wants to ban it then I will not say no

''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

देशात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणूकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय वातावरण तापले आहे. देशभरात झालेल्या या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्र सरकारला धारेवर धरलं जात आहे. यादरम्यान देशात वाढत्या जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर १३ विरोधीपक्ष नेत्यांनी एकत्र येत एक निवेदन देखील जारी केले होते. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, रामनवमीच्या वेळी जातीय हिंसाचार झाल्याचे आपण कधी ऐकले नव्हते. त्यामागे भाजप आणि त्यांच्या काही संघटना आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरूमध्ये बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोणतीही संघटना जी समस्या निर्माण करते, अशांतता निर्माण करू शकते आणि कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला (PFI) बंदी घालायची असेल तर मी नाही म्हणणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?; BMC कडून १५ दिवसांची मुदत

राज्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला त्यानंतर त्यांच्या त्या अल्टिमेटमला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे त्यांना काही संघटनांकडून धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. याआधी राज ठाकरेंच्या मशिदींतील भोंगे हटवण्याच्या अल्टिमेटमला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेकडून 'छेडोगे तो छोडेंगे नही' असा इशारा दिला मनसेला दिला होता.

हेही वाचा: "९० टक्के बांधकामं बेकायदेशीर आहेत, अगदी…'; नारायण राणेंचा आरोप

Web Title: Sharad Pawar Says Organisation Creates Problems And Govt Wants To Ban It Then I Will Not Say No

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..