शरद पवार म्हणतात, आपली बांधीलकी सर्वसामान्यांशी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 13 December 2019

आई, पत्नी, मित्राचा वाढदिवस लक्षात राहतो
माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहात नाही, परंतु माझ्या आईचा जन्मदिवस लक्षात राहातो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा वाढदिवस ११ डिसेंबर आहे, याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.

मुंबई - ‘आपली बांधीलकी शेवटच्या माणसाशी...समाजातील तरुण पिढीशी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवे,’’ असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बळिराजा कृतज्ञता दिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बळिराजा कृतज्ञता कोश प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदान केला. पवार म्हणाले, ‘‘आज जो धनादेश दिला तो ‘वेल्फेअर ट्रस्ट’च्या वतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या, आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये मुदत ठेव म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्या वेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल. शेतकऱ्यांची मुले सज्ञान व आत्मसन्मानाने उभी कशी राहतील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी दिले.

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर.. 

‘माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. ती १९३६ मध्ये लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे, असा तिचा आग्रह होता, अशा आठवणी शरद पवार यांनी सभागृहात सांगितल्या. सार्वजनिक जीवनात यश मिळते. संकटे येतात. त्या वेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

पक्षनेत्यांकडून शुभेच्छा
शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, राज्याचे मंत्री सुभाष देसाई उपस्थित होतेच. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव पितांबर मास्टर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार अजित पवार, ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे आदी नेत्यांसह पक्षाचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar talking birthday politics