सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की लोकशाही मूल्य आणि घटनेच्या तत्वांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज संविधान दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी हा निकाल आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही खरी आदरांजली आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताघडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की लोकशाही मूल्य आणि घटनेच्या तत्वांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज संविधान दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी हा निकाल आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही खरी आदरांजली आहे.

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क

महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच या सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रिकरण करावे लागणार आहे. यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आवाजी मतदानाने मतदान न घेता गुप्त मतदान घ्यावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar talking on supreme court decision