
राज्य शासनाने मागील राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अंशतः विनाअनुदानित शाळांमधील संतप्त शिक्षकांनी, विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.