Sharad Pawar: उद्घाटनाला गेले अन् म्हणाले कारखाना उभा राहणार नाही... पवारांनी सांगितला हिंजवडी IT पार्कचा किस्सा

Sharad Pawar: हिंजवडीत असणार आयटी पार्कमधील सुमारे ४० कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे. कंपन्या गंभीर वाहतूक समस्येला कंटाळून त्यांनी स्थलांतर केले आहे अशी माहिती देण्यात येत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSakal

Sharad Pawar: हिंजवडीत असणाऱ्या आयटी पार्कमधील सुमारे ४० कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे. कंपन्या गंभीर वाहतूक समस्येला कंटाळून त्यांनी स्थलांतर केले आहे अशी माहिती देण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी 'युवासंघर्ष' यात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिळक स्मारक मंदिरात उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले होते. या यात्रेत खासदार श्रीनिवास पाटील, कामगार नेते बाबा आढाव, खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Sharad Pawar
PM Modi on Rahul Gandhi : ...अन् मोदींनी राहुल गांधींना केला फोन; नेमकं काय घडलं? पंतप्रधानांनीच सांगितला किस्सा

या यात्रेच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हिंजवडी IT पार्कचा किस्सा सांगितला होता. शरद पवार म्हणाले, पुण्यापासून २० किमी वर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला नाना नवले यांनी मला बोलावलं होतं.

Sharad Pawar
Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

नाना नवले हे साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याचं ठरवलं होतं. मी तिथे गेलो नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभा राहिलो आणि सांगितलं की इथे कारखाना होणार नाही.

ते म्हणाले भूमिपूजनाला बोलावलं आणि सांगताय की साखर कारखाना होणार नाही. मी म्हणालो तुम्हाला कारखान्यासाठी दुसरी जागा देतो पण इथे कारखाना होणार नाही ते म्हणाले मग इथे काय होणार मी म्हणालो इथे IT पार्क होणार. आज हिंजवडीमध्ये मोठं IT पार्क उभा राहिलं. असा किस्सा शरद पवार यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com