Marathwada Rain : दुष्काळी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय, शेतकरी राजा संकटात; सरकारने तातडीनं मदत करावी : शरद पवार

Sharad Pawar On Marathwada Rain : मराठवाड्यात जे जिल्हे दुष्काळी आहेत त्याच जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी गावांमध्ये शिरले असून पूरस्थिती निर्माण झालीय.
Marathwada Faces Flood Crisis

Marathwada Faces Flood Crisis Government Urged to Act Immediately

Esakal

Updated on

Marathwada Faces Flood Crisis: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात अतिवृष्टी झालीय. मराठवाड्यात दुष्काळी भागातही पावसानं झोडपलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्याचं हाता तोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतलंय. राज्यात सुरू असलेला पाऊस आणि नुकसानीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. शेतकरी संकटात सापडला आहे. पिकं कुजून गेली आहेत तर सोयाबीन उद्ध्वस्त झालंय. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून सरकारने त्यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com