2019 च्या विधानसभा आणि 'भाजप'बाबत शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य, शरद पवार म्हणालेत... 

2019 च्या विधानसभा आणि 'भाजप'बाबत शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य, शरद पवार म्हणालेत... 

मुंबई : संजय राऊत यांनी शरद पवारांची नुकतीच प्रदीर्ध  मुलाखत केली. त्याचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय. यामध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे आपलं मत मांडलाय. 2019  च्या विधानसभा निवडणुकांवर देखील शरद पवारांनी आपलं मत मांडलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकल्या. परंतु या यशात शिवसेनेचे मोठे योगदान होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी अनेक विषयांवर मते मांडली.

शरद पवार म्हणाले की, विधानसभेला भाजप आमदारांची संख्या 105 झाली त्यात शिवसेनेचे योगदान फार मोठे होते. त्यातून तुम्ही शिवसेना वजा केली असती, म्हणजेच भाजोसोबत युती केली नसती तर भाजप आमदारांचा आकडा 40-50 च्या आसपास दिसला असता. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असेही सांगितले. विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी उत्तरे दिली.

पवार म्हणाले, आमदारांचा आकडा 105 पर्यंत पोहोचवण्याचे काम ज्यांनी केले त्याच शिवसेनेला फडणवीस आणि भाजपने गृहीत धरले. याच चूकीमुळे 105 आमदारांचे बळ असतानासुद्धा भाजप सत्ता स्थापू शकला नाही. सत्तेवर येऊ शकला नाही.  भाजपचे नेते सांगतात की, आम्ही 105 असतानाही आम्हाला आमच्या सहकाऱ्याने म्हणजे शिवसेनेने दुर्लक्षित केले किंवा सत्तेपासून दूर ठेवले. त्यांना 105 पर्यंत पोहोचवण्याचे काम ज्यांनी केले त्यांनाच जर गृहीत धरण्याची भूमिका भाजपने घेतल्यावर इतरांनी काही वेगळे राजकारण करण्याची आवश्यकता नाही.

( संपादन - सुमित बागुल )

sharad pawaras interview by sanjay raut what pawar said about 2019 vidhansabha election and bjp

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com