Sharankumar Limbale Black and White Interview : "अस्पृश्यांपेक्षाही अधिक अस्पृश्य आयुष्य जगलो!" शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळेंची 'साम टीव्ही'वर रोखठोक मुलाखत; 'अक्करमाशी'तून मांडला वेदनेचा शिलालेख!

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा 'ब्लॅक अँड व्हाइट'मध्ये भावनिक संवाद; 'अक्करमाशी' शब्दाचा अर्थ, निवडीवरील टीका आणि 'बदनाम व्यवस्थेचा पंचनामा' यावर सविस्तर भाष्य.
Lived a life more untouchable than untouchables!' - Dr. Sharankumar Limbale

Lived a life more untouchable than untouchables!' - Dr. Sharankumar Limbale

Sakal

Updated on: 

पुण्यात होणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड झाली आहे. शतकमहोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. लिंबाळे यांनी 'साम टीव्ही'च्या (सकाळ माध्यम समूह) 'ब्लॅक अँड व्हाइट' या विशेष मुलाखतीत आपल्या आयुष्यातील संघर्ष, 'अक्करमाशी'चा खरा अर्थ आणि सध्या सुरू असलेल्या टीकेवर अत्यंत परखड भाष्य केले आहे. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी १९९९ मध्ये लिहिलेल्या 'पुन्हा अक्करमाशी' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मांडलेली भूमिकाही आज पुन्हा एकदा तितकीच जिवंत आणि समर्पक ठरत आहे.

Loading content, please wait...