Navneet Rana: "त्या आता चौथ्या क्रमांकावर घसरणार," कट्टर विरोधक नवनीत राणांवर बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bachhu Kadu: प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या महायुतीमध्ये आहेत. पण राणा यांच्याशी असलेल्या वैरामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या पक्षाकडून दिनेश बूब यांना मैदानात उतरवले आहे.
Bacchu Kadu On Navneet Rana Nomination
Bacchu Kadu On Navneet Rana NominationEsakal

Bacchu Kadu On Navneet Rana's Nomination:

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचे व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचे वैर सर्वश्रुत आहे. अशात आज अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला.

यावर पत्रकारांनी आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा आमदार कडू म्हणाले की, या निवडणुकीत नवनीत राणा यांची चौथ्या क्रमांकावर घसरण होईल. त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील.

पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, "आमच्या उमेदवाराचा अर्ज भरताना फक्त गर्दी नव्हे तर दर्दी लोकही होते. त्यांच्याकडे गर्दी आहे पण त्यांना निम्मी मतेही मिळणार नाहीत. मला नाही वाटत की, त्यांना तिसऱ्या क्रमांकाचीही मते मिळतील. त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही कमी मते मिळतील. आणि त्या चौथ्या क्रमांकावर घसरतील."

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेले जात पाडताळणी प्रमाणपत्रही वैध ठरवले. त्यामुळे राणा यांना मोठा दिला मिळाला आहे. या निकालानंतर राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी कडू यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही भाष्य केले.

यावर आमदार कडू म्हणाले, "या प्रकरणाचा निकाल लागायच्या आधीच भापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पण ही आता तानाशाहीची हाईट झाली आहे. सर्वसामान्यांचा न्यायालयावर विश्वास आहे. आणि तो विश्वास जर असा पायदळी तुडवला जात असेल तर सगळं संपल्यात जमा आहे."

अचलपूरचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या महायुतीमध्ये आहेत. पण राणा यांच्याशी असलेल्या वैरामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या पक्षाकडून दिनेश बूब यांना मैदानात उतरवले आहे. या परिस्थितीमुळे महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com