Photo: शीना बोरा हत्याकांड; इंद्राणी मुखर्जीला जामीन, पाहा काय आहे प्रकरण

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे.
Sheena Bora Murder Case
Sheena Bora Murder Caseesakal
Updated on

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे. तिला विशेष सीबीआय कोर्टातून दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे.
शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे.Sakal
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली.
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. Sakal
इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.Sakal
२०१५ मध्ये ही घटना उघडकीस आल्यावर कळलं की इंद्राणीने शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असताना पीटर आणि इंद्राणी यांनी घटस्फोट घेतला.
२०१५ मध्ये ही घटना उघडकीस आल्यावर कळलं की इंद्राणीने शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असताना पीटर आणि इंद्राणी यांनी घटस्फोट घेतला.Sakal
शीना बोरा हत्याकांडात गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणीला दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
शीना बोरा हत्याकांडात गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणीला दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर केला होता.Sakal
इंद्राणी मुखर्जीने एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिला जामीन दिला होता.
इंद्राणी मुखर्जीने एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिला जामीन दिला होता.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com