Sheetal Mhatre News : दुचाकीस्वारांकडून शितल म्हात्रेंचा पाठलाग; थेट पोलिसांत दिली तक्रार

sheetal mhatre chased by bikers police case registered sheetal mhatre prakash surve video news
sheetal mhatre chased by bikers police case registered sheetal mhatre prakash surve video news esakal

शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आता म्हात्रे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शिवाजी पार्क येथून बाळासाहेब भवन येथे जात असताना दोन तरुणांनी पाठलाग केल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तक्रार नोंदवली आहे. शितल म्हात्रे यांनी सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

शितल म्हात्रे यांनी सांगितले की, मी शिवाजी पार्क येथून मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन या आमच्या पक्षाचे कार्यालयाकडे जात होते. सिद्धिविनायक मंदिर परिसरातून जात असताना दुचाकीवर बसलेले दोन माझ्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होते. ते माझ्या गाडीजवळ येऊन उभे राहण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्याकडे पाहून बोट दाखवत इशारे करत होते.

sheetal mhatre chased by bikers police case registered sheetal mhatre prakash surve video news
Bhushan Desai News : भूषण देसाईंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? स्पष्टच सांगितलं कारण…

पुढे त्या म्हणाल्या की, माझ्या गाडीच्या बाजूला येण्याचा ते प्रयत्न करत होते. परंतु माझ्या सुरक्षेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पाहून ते घाबरले आणि थोडे मागे झाले. मला वाटते की असे प्रसंग पोलिसांना सांगितले पाहिजे आणि त्यासाठी मी आज सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना भेटले. त्यांना पत्र देऊन घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. पुढे पुन्हा अशी काही घटना घडू नये यासाठी मी त्यांना पत्र दिले आहे.

sheetal mhatre chased by bikers police case registered sheetal mhatre prakash surve video news
Chitra Wagh News : 'शितल… तू लढ आम्ही तुझ्यासोबत; या हरामखोरांना…'; 'त्या' व्हिडीओवर चित्रा वाघ भडकल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com